महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

82 वर्षाच्या आजीची कोरोनावर मात; रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून दिल्या शुभेच्छा

सावंगी मेघे रुग्णालयात कोरोना केअर युनिटमध्ये 82 वर्षाच्या कोरोनाबाधित आजीवर उपचार सुरू होते. या आजीने अखेर कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

woman
कोरोनामुक्त झालेली ८२ वर्षाची आजी

By

Published : Jul 1, 2020, 8:18 PM IST

वर्धा- 82 वर्षाच्या आजीने यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. ही आजी सावंगी मेघे रुग्णालयात कोरोना केअर युनिटमध्ये मागील 14 दिवसांपासून उपचार घेत होती. आज त्यांना सुट्टी झाली असून टाळ्या वाजवत त्यांचे स्वागत करण्यात आले.

वयोवृद्ध 82 वर्षीय आजीच्या जावयांना सावंगी मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्या जवळच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांचा कोरोना चाचणी अहवाल घेण्यात आला. यावेळी 82 वर्षीय आजीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. त्यांच्यावर सावंगी मेघे रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी यशस्वीपणे प्रतिसाद देत कोरोनावर मात केल्याची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी केली.

आज 82 वर्षीय आजीला कोरोना मुक्त झाल्याने रुग्णालय प्रशासनाकडून टाळ्या वाजवत शुभेच्छा देण्यात आल्या. यासह आज कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने 231 जणांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे. त्यांना बरं वाटतंय का, काळजी घ्या असे सांगत सीएमओ चंद्रशेखर महाकाळकर यांनी विचारपूस केली.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित संख्या 16 जण आहे.

कोरोनामुक्त - 11

नागपूर उपचार- 1

जिल्हा उपचार- 3

कोरोनामुळे मृत्यू -1

आज गृहवीलगिकरणात असलेले - 5957

संस्थात्मक विलगिकरणात असलेले - 102 रुग्ण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details