वर्धा -जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. रविवारी सकाळी आलेल्या अहवालांत 6 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 44 वर पोहोचली आहे. तर आणखी एक बाहेर राज्यातील व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे.
यानंतर प्रशासनाने कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. प्रशासनाने सहा कंटेंमेंट झोन तयार केले आहेत. प्रशासकीय भवनातील कार्यरत अधिकारी पॉझिटिव्ह आले होते. यानंतर त्यांच्या पत्नीसोबत एक मुलगी आणि दोन लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील गोंड प्लॉटमध्ये शनिवारी एक रुग्ण आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील आणखी एकाला तसेच आर्वी येथील 23 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. यासह मूळ बिहार राज्यातील आणि सध्या उत्तम गलवा स्टील कंपनीत कार्यरत असलेल्या 39 वर्षीय व्यक्ती कोरोनाची लागण झाली आहे.