महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 16, 2020, 2:12 PM IST

ETV Bharat / state

वर्ध्यात पुन्हा 7 कोरोना रुग्णांची वाढ, उपजिल्हा रुग्णालयातील दोघांचा समावेश

वर्धा जिल्ह्यात आज (दि.16 जुलै) 7 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी दोघे आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आहेत.

arvi hospital
arvi hospital

वर्धा- आज (दि. 16 जुलै) सकाळीच 7 रुग्णांंची कोरोनाबाधित असल्याची नोंद झाली. विशेष म्हणजे कोरोनाचे लोण हे शासकीय रुग्णालयात पोहोचल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात आर्वी उपजिल्हा रुग्णलयातील परिचारिका आणि अटेंडन्टचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज 7 कोरोना बाधित सापडले असून यामध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यात आर्वीत दोन रुग्णाची नोंद आहे. कारंजा तालुक्यात 2, तर वर्धा शहरातील 3 वेगवेगळ्या भागातील असून सात जणांचा समावेश आहे.

आज बाधित झालेल्या रुग्णांमध्ये आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्स वय 35 वर्ष आणि अटेंडन्ट हे मागील काही दिवसांपासून रुग्णलयात येणाऱ्या रुग्णांना आयसोलेशन वार्डात आपली सेवा देत आहे. यातून त्यांना बाधा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. यात हे मागील तीन-चार दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने घरात विलगिकरणात होते. त्यांंचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वर्धा शहरातील वर्धा शहरातील इतवारा येथील 72 वर्षीय वयोवृद्ध महिला, हिंद नगर येथील वयोवृद्ध 75 वर्षीय पुरुष आणि केशव सिटी येथील 37 वर्षीय पुरुष असे तिघे शहरात नव्याने आढळून आलेल्या तिघांची नावे आहेतं. यासह कारंजा तालुक्यातील काकडा 30 वर्ष पुरुष आणि 20 वर्षीय महिला या रुग्णांचा समावेश आहे. यातील दोन रुग्णांना सेवाग्राम येथे तर पाच रुग्ण वर्धेच्या उपजिल्हा रुग्णालयात आयसोलेशनमध्ये असताना त्यांना सावंगी रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

या वाढलेल्या रुग्णामुळे जिल्ह्यातील बाधितांची रूग्णसंख्या 58 वर पोहचली आहे. जिल्ह्यात 29 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पण, आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्वी शहरात सध्या उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांच्या आदेशाने रविवारपर्यंत (19 जुलै) संचारबंदी असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details