महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रवेशमार्गावर 'नो एन्ट्री', वाहनतळाचा सहाय्याने शहराच्या सीमेवरच ब्रेक - वर्ध्यात आयतमार्गावर नो एन्ट्री

जिल्ह्यातून भाजीपाला आवक थांबवण्यात आली आहे. बाहेर हॉटस्पॉट जिल्ह्यातून येणारे ट्रकचालक हे कोरोनाचा वाहक ठरल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकेल. यात भाजीबाजार ही गर्दीची ठिकाणं असल्याने धोका संपवत आवक थांबवत नो एन्ट्री करण्यात आली आहे.

कोरोनाचा आयतमार्गावर नो एन्ट्री
कोरोनाचा आयतमार्गावर नो एन्ट्री

By

Published : May 1, 2020, 8:43 AM IST

Updated : May 1, 2020, 11:51 AM IST

वर्धा - कोरोना कोणत्या मार्गाने येईल याचा नेम नाही. यामुळे त्याचा प्रवेशमार्ग ठरू शकेल अशा मार्गांवर बाहेर जिल्ह्यातील वाहतूक अडवली जाणार आहे. याकरता नवनवीन संकल्पना राबवत खबरदारी घेतली जात आहे. वर्ध्यात कांदा, बटाटा उतरवण्यासाठी शहराच्या सीमेवरच वाहनतळ तयार करण्यात आले आहे. यामुळे पुढील काळात बाहेर जिल्ह्यातून आलेली वाहने शहरात येणार नाही. या मार्गाने कोरोनाच्या शिरकावाचा धोका टाळत उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील चार ठिकाणी वाहनतळ तयार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली आहे.

बाहेर जिल्ह्यातून आलेला माल

वर्धा महाराष्ट्रात पहिला जिल्हा असेल जिथे बाहेर जिल्ह्यातून भाजीपाला आवक थांबवण्यात आली आहे. बाहेर हॉटस्पॉट जिल्ह्यातून येणारे ट्रकचालक हे कोरोनाचा वाहक ठरल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकेल. यात भाजीबाजार ही गर्दीची ठिकाणं असल्याने धोका संपवत आवक थांबवत नो एन्ट्री करण्यात आली आहे. भाजीपाला मुबलक प्रमाणात असला तरी बटाटा , कांदा, लसूण, आलं, फळ हे उत्पादित होत नसल्याने ते बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून आयात केले जात आहे.

कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी आयतमार्गावर नो एन्ट्री

बटाटा कांद्यासह 'कोरोनाची' आवक थांबवली

बाहेर जिल्ह्यातून बटाटा-कांदा आणत असताना अनेक धोकादायक जिल्ह्यातून वाहतूक करत यावी लागते. यामुळे ट्रॅकसोबत येणारे चालक-वाहक हे थेट शहरातील बाजारात पोहचले असता धोका निर्माण होऊन संपूर्ण शहर कोरोनाबाधित होण्याचा धोका नाकारला जाऊ शकत नाही. यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणारे ट्रक शहराच्या सीमेवर रोखून त्या गाड्या सॅनिटाइज करून स्थानिक मजुरांच्या साह्याने खाली करून दुसऱ्या वाहनातून हा माल बाजारात सुरक्षित पद्धतीने पोहचवण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी प्रवेशमार्गावर 'नो एन्ट्री'

शहरात भाजी असली तरी बटाटा, कांदा, आलं, लसूण आणि फळ याची कमतरता होऊ नये, यावरून हे ट्रक बाहेरच उतरवण्याचे ठरले. यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी बाहेर सोयीस्कर म्हणून राजेश मुराराक यांच्याकडे उपलब्ध जागेचा पर्याय सुचवला. लगेच उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी जागेची पाहणी केली. जिल्हाधिकारी यांनी होकार दर्शवताच जिल्ह्यात अशा पद्धतीने चार ठिकाणे निवडण्यात आली.

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी शहराच्या दत्तपुर जवळच्या जागेची पाहणी करून उपक्रमाला सुरुवात केल्याचे सांगितले. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओम्बासे, एसडीओ सुरेश बगळे, एसडीपीओ पियुष जगताप, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, तहसीलदार प्रीती डुडुलकर यांच्यासह एपीएमसी सभापती श्याम कार्लेकर, सचिव समीर पेंडसे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Last Updated : May 1, 2020, 11:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details