वर्धा- नागपूर-हैदराबाद महामार्गावर बरबडी शिवाराच्या वळणावर दुचाकी शिवशाहीला धडकल्याने अपघात झाला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन भावांचा समावेश आहे.
नागपूर हैदराबाद महामार्गावर दुचाकीची शिवशाहीला धडक, तिघांचा मृत्यू - नागपूर हैदराबाद महामार्ग वर्धा
नागपूर-हैदराबाद महामार्गावर बरबडी शिवाराच्या वळणावर दुचाकी शिवशाहीला धडकल्याने अपघात झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोन भावांचा समावेश आहे.
अशोक तालवटकर(३५), नितेश तालवटकर(२४), रोशन भोयर(३२), असे मृतांची नावे आहेत. तिघेही समुद्रपूर तालुक्यातील चिखलीचे रहिवासी आहेत. त्यांची दुचाकी बरबडी शिवाराच्या वळणावर नागपूरहून चंद्रपुरकडे जात असलेल्या शिवशाही बसला धडकली. यामध्ये अशोक तालवटकर आणि रोशन भोयर यांचा जागीच मृत्यू झाला, तर नितेश गंभीर जखमी झाला. जाम महामार्ग पोलीस चौकीला अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस कर्मचारी ज्योती राऊत, गणेश पवार, सुनिल श्रीनाथे, बावणे, प्रदिप डोंगरे आदींनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. यासह वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा पुढील तपास समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत काळे करत आहेत.