महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्धेतील 'त्या' पीडितेवर नागपुरात उपचार सुरू - burn victims in Wardha

ती नांदोरी चौकात बसमधून उतरली. त्यानंतर महाविद्यालयाकडे जात असताना त्याने तिच्यावर पेट्रोल टाकले. तिचा आवाज ऐकताच स्थानिकांनी धाव घेतली.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Feb 3, 2020, 2:59 PM IST

Updated : Feb 3, 2020, 3:21 PM IST

नागपूर- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नांदोरी चौकात प्राध्यापक तरुणीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पीडित तरुणी ही 28 टक्के भाजली असून तिच्यावर नागपुरातील खासगी रुगणालयात उपचार सुरू आहेत.

वर्धेतील 'त्या' पीडितेवर नागपुरात उपचार सुरू

हिंगणघाट शहरातील नांदोरी चौकात घडलेल्या या अमानुष घटनेत पीडित तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे. आज सकाळी गावावरून ही तरुणी बसने हिंगणघाट येथे आली. नांदोरी चौकात बसमधून उतरल्यानंतर ती महाविद्यालयाकडे जात असताना विकेश नगराळे या तरुणाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या ओरडण्याचे आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तिला वाचवण्यासाठी धडपड केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा - धक्कादायक..! वर्ध्यात तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

त्याने मागील तीन महिन्यांपूर्वी पीडित तरुणीला त्रास दिला होता. त्यावेळी पीडितेच्या वडिलांनी त्याला धमकावल्यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर प्रकरण शांत झाल्याचे वाटत होते. मात्र, आज अचानक आरोपीने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. विकी हा विवाहित असून त्याला एक मुलगी देखील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक

Last Updated : Feb 3, 2020, 3:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details