वर्धा -जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आता, म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस आजाराने डोके वर काढले आहे. म्युकरमायकोसिस आजाराचे जिल्ह्यात 21 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक 8 शस्त्रक्रिया या सावंगी रुग्णलायत करण्यात आल्या आहेत.
8 रुग्णांवर शस्त्रक्रिया
यापूर्वी यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात देखील या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. आता वर्ध्यात देखील या आजाराने शिरकावर केला असून, सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णलय, शरद पवार डेंटल कॉलेजमध्ये आतापर्यंत 17 रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे. यातील 8 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, फंगस शरीरात पसरल्यास काही केसेसमध्ये रुग्णाचा डोळा देखील काढावा लागतो अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी दिली. यासोबतच वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णलायत 4 जणांना या आजाराची लागण झाली आहे.
हेही वाचा -सिंधुदुर्ग व गोव्यात हायअलर्ट; किनारी भागात वाहू लागले जोरदार वारे