वर्धा- कंटनेरने कारला धडक दिल्याची घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव लगतच्या खडका शिवारत घडली आहे. या भीषण अपघातात कारमधील दोघा जणांचा मृत्यू झाला असून कारचा चुराडा झाला आहे.
नागपूर-अमरावती महामार्गावर कंटेनर-कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
अनंत मुसळे असे मृत्यू झाल्येल्या व्यक्तीचे नाव आहे. मुसळे हे अमरावतीतील जात पडताळणी विभागातील जिल्हा संशोधन विभागात काम करतात. त्यांच्याबरोबर इतर एका व्यक्तीचा देखील मृत्यू झाला आहे. मात्र, या व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकली नाही. कंटेनरने जोरादर धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.
अनंत मुसळे असे मृत्यू झाल्येल्या व्यक्तीचे नाव आहे. मुसळे हे अमरावतीतील जात पडताळणी विभागातील जिल्हा संशोधन विभागात काम करतात. त्यांच्याबरोबर इतर एका व्यक्तीचा देखील मृत्यू झाला आहे. मात्र, या व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकली नाही. कंटेनरने जोरादर धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कंटेनर घटनास्थळावरून काही अंतर पुढे जाऊन थांबला. कंटेनरमधील चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी तळेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ते पुढील तपास करत आहे.
हेही वाचा-हिंगणघाट जळीतकांड: मृत्युपूर्व जबाबाची काय असेल भूमिका, जाणून घ्या.....