महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नववर्षाची पार्टी बेतली जिवावर, विहिरीत पडून दोघांचा मृत्यू - विहरीत पडून दोघांचा मृत्यू

गौतम चिंधू फुलझेले (वय48) आणि किरण तुळशीराम देशमुख (वय40) अशी मृतांची नावे आहेत. नव वर्षानिमित्त आगरगाव लोणी मार्गावरील शेतात पार्टीचे आयोजन केले गेले होते. रात्रीच्या सुमारास पार्टीनंतर अचानक दोघांचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला.

विहीरीत पडून दोघांचा मृत्यू
विहीरीत पडून दोघांचा मृत्यू

By

Published : Jan 2, 2020, 2:12 AM IST

वर्धा- देवळी तालुक्यातील आगरगाव येथे 31 डिसेंबरच्या रात्री विहिरीत पडल्याने बुडून दोघांचा मृत्यू झाला. नव वर्षानिमित्त आगरगाव लोणी मार्गावरील शेतात पार्टीचे आयोजन केले गेले होते. रात्रीच्या सुमारास पार्टीनंतर अचानक दोघांचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला.

गौतम चिंधू फुलझेले (वय48) आणि किरण तुळशीराम देशमुख (वय40) अशी मृतांची नावे आहेत. आगरगाव येथील बालू उर्फ रवींद्र अंदूरकार यांचे शेत मकत्याने करण्यासाठी मयूर सुरेश देवघरे यांनी घेतले. नव वर्षाचा बेत म्हणून शेतात पार्टी करण्याचे ठरले. यासाठी त्यांनी गौतम फुलझेले, दामूजी नेहारे, किरण देशमुख या तिघांना शेतात बोलावून घेतले.

चौघांनी शेतात विहिरीजवळ पार्टी केली. यावेळी बोलणे सुरु असताना गौतम आणि किरण हे विहिरीत पडले. यानंतर मयूर देवघरे आणि दामू नेहारे यांनी आरडाओरडा करत गावातील काहींना बोलावून आणले. पोलिसांनादेखील याबद्द्लची माहिती देण्यात आली. मात्र, काही मदत करण्याआधीच दोघेही विहिरीत बुडाले.


1 जानेवारीला सकाळी पुलंगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी पार्टी केल्याचे साहित्य आणि मोटर सायकल आढळून आली. दोघांचेही मृतदेह पुलंगावला शविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details