वर्धा -आर्वी तालुक्यातील कर्माबादच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या0 10 वर्षीय चिमुकलीला कॅन्सरने ग्रासले. तिच्या कौटुंबीक परिस्थितीची जाणीव असल्याने तिच्या शिक्षकाने स्वतः पुढाकार घेत तिच्या उपचारासाठी धडपड केली. शिक्षक आणि काकाने मिळवलेल्या मदतीतून या मुलीवर यशस्वीपणे उपचार झाले आहेत. एरवी ज्ञान दानाचे काम करणारे उमेश दगडकर हे शिक्षक कॅन्सरग्रस्त चिमुकलीसाठी जणू देवच झाले आहेत.
कर्माबाद येथील 10 वर्षाची ज्ञानेश्वरी टुले ही मुलगी प्राथमिक शाळेत शिक्षण घेते. तिचे कुटुंब अतिशय सामान्य आहे. तिचे वडील सुतारकाम करून हातावर आपले कुटुंब चालवतात. शाळेत नेहमी हसत-खेळत प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या ज्ञानेश्वरीला 10 महिन्यांपूर्वी अचानक आजारी पडली. शिक्षक उमेश दगडकर यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तिच्या वडिलांना दवाखान्यात नेण्यास सांगितले. तिच्या प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. यात तिला रक्ताचा कॅन्सर असल्याचे निदान झाले.
रिपोर्ट पाहिला अन् शिक्षक चक्रावून गेले -
ज्ञानेश्वरीचा रिपोर्ट सर्व प्रथम तिच्या शिक्षकांनी पाहिले. उमेश दगडकर यांना रिपोर्ट पाहून धक्का बसला. त्यांनी तिच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. मात्र, हातावर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या वडील धनराज टुले यांना मुलीचा उपचार कसा करावा, असा प्रश्न पडण्यापूर्वीच शिक्षक उमेश यांनी यावर उपाय शोधला. उमेश यांनी ज्ञानेश्वरीचे काका अनुप यांच्या सोबतीने तिच्या उपचारांसाठी मदत मिळवण्यास सुरुवात केली. शिक्षकाच्या शब्दावर विश्वास ठेवत अनेकांनी मदतीचा हात पुढ केला. या मदतीतून ज्ञानेश्वरीच्या उपचारांसाठी 2 लाख 47 हजार रुपये जमा झाले.
अनेकांनी दिला मदतीचा हात -