बुलडाणा - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या स्वॅबच्या नमुन्याचे अहवालांपैकी 37 अहवाल आज (बुधवारी) प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 35 अहवाल कोरोना निगेटिव्ह, तर 2 अहवाल कोरोनाबाधित आढळले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात आणखी 2 कोरोनाबाधितांची भर, संख्या 50 वर - Buldana coronavirus cases
जिल्ह्यात एकूण 50 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 3 मृत आहे. आज शेगाव येथील 30 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला वैद्यकीय नियमानुसार सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील निमखेड येथील 22 वर्षीय तरूण आणि मलकापूर येथील 38 वर्षीय पुरूष आहे. निमखेड येथील तरुणाचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. तसेच शेगाव येथील एका महिला रुग्णाला मागील दहा दिवसांपासून कोरोनाचे कुठलेही लक्षणे नसल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 1015 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यात एकूण 50 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 3 मृत आहे. आज शेगाव येथील 30 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाला वैद्यकीय नियामानुसार सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 28 कोरोनाबधित रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 28 वर पोहोचली आहे. सध्या रुग्णालयात 19 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज 27 मे रोजी 37 अहवाल प्राप्त झाले आहेत. तसेच आज 64नमुनेअहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण 1015निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.