महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात दिवसभरात कोरोनाचे नवीन 57 रुग्ण, 168 रुग्ण बरे - Pune coronavirus news

आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 6529 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 3950 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

Pune Municipal Corporation
पुणे महापालिका

By

Published : Jun 1, 2020, 9:24 PM IST

पुणे - दिवसभरात कोरोना आजारातून मुक्त झालेल्या 168 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर नव्याने 57 रुग्ण सापडले आहेत. आज कोरोनाच्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. दिवसभरात 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यात 5 महिला आणि एका पुरुषांचा समावेश आहे.

आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 6529 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 3950 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात बरे झालेल्या 168 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 2259 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आजवर 320 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात मुंबईनंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सहा हजारावर जाऊन पोहोचला आहे. त्यात दररोज नवीन रुग्णाची भर पडत आहे. दाट झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची संख्या मोठी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details