नंदुरबार -तळोदा शहरातील नागाई नगरात झालेल्या चोरीचा पोलिसांनी अवघ्या तीन तासात छडा लावला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या या कामगिरीत अवघ्या तीन तासात संशयित आरोपीला गजाआड केले आहे. चंद्रशेखर नथ्थू मेश्राम (रा. चिंचपाडा भिलाटी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा... सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला पुण्याजवळ अपघात; 16 जखमी
नंदुरबार शहरातील नागाई नगरातील रहिवासी दिपक दानूमल हिंदुजा हे आपल्या कुटुंबीयांसह घरात झोपले असताना, घराच्या मागे असलेल्या लोखंडी दरवाज्यातून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी घरातील 67 हजार रुपये किंमतीचे चार मोबाईल लंपास केले होते.