महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 9, 2020, 7:36 AM IST

ETV Bharat / state

नागपुरात एका दिवसात दहा नव्या कोविड रुग्णांची नोंद, ३१ जण कोरोनामुक्त

नागपूरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरवर पोहचण्यासाठी 45 दिवसांचा अवधी लागला होता. मात्र, त्यानंतर सहाशे वरून सातशे म्हणजेच शंभर रुग्ण हे केवळ 4 दिवसांत झाले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची काळजी अजून वाढली आहे.

सोमवारी ३१ रुग्ण कोरोनामुक्त
सोमवारी ३१ रुग्ण कोरोनामुक्त

नागपूर - सोमवारी दिवसाभरात कोरोनाच्या 10 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 718 झाली आहे. तर, 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 471 झाली आहे.

३१ रुग्ण कोरोनामुक्त

सोमवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 2 नव्या वस्त्यांचा समावेश आहे. सोबतच नागपूर ग्रामीण मधील एका रुग्णाचा समावेश आहे. त्याच बरोबर एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. या 42 वर्षीय रुग्णाला किडनीचा आजार असल्याने तो डायलिसिसवर होता. या रुग्णाच्या मृत्यूमुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची मृत्यूसंख्या 15 वर पोहचली आहे.

नागपूरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरवर पोहचण्यासाठी 45 दिवसांचा अवधी लागला होता. मात्र, त्यानंतर सहाशे वरून सातशे म्हणजेच शंभर रुग्ण हे केवळ 4 दिवसांत झाले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची काळजी अजून वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details