महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूरच्या पोलीस आयुक्तांना कोरोनाची लागण; कार्यालयातील कर्मचाऱ्यांना खबरदारीच्या सूचना - नागपूर जिल्हा बातमी

नागपूरच पोलीस आयुक्त यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

अमितेश कुमार
अमितेश कुमार

By

Published : Nov 19, 2020, 3:48 PM IST

नागपूर- पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. या संदर्भात खबरदारी म्हणून अमितेश कुमार सध्या विलगीकरणात आहेत. शिवाय त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती पोलीस खात्याकडून देण्यात आली आहे.

कोरोनाचे संसर्ग कमी अधिक प्रमाणात आहे. विविध राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांना लागण होत असल्याचे दिसून येत आहे. नागपुरातही कोरोनाचा संसर्ग अजूनही सुरूच आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितश कुमार हे गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी कार्यालयीन कामात व्यस्त आहेत. या दरम्यान ही लागण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त सध्या विलगीकरणात आहे. शिवाय आपल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही खबरदारीचे आवाहन अमितेश कुमार यांनी केले आहे.

यापूर्वीही पोलीस खात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. शिवाय माजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही नागपुरात असताना कोरोनाची लागण झाली होती.

संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन

प्रकृती ठणठणीत आहे, काळजी करण्याची गरज नाही. शिवाय माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तीने आपली कोरोना चाचणी करून घ्यावे, असे आवाहनही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details