महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात नव्या 91 रुग्णांची नोंद ; तर 43 जणांची कोरोनावर मात - akola corona positive patients today

जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 800 वर पोहचली आहे. त्यामध्ये 2 हजार 286 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर सध्या 401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

अकोला कोरोना अपडेट
अकोला कोरोना अपडेट

By

Published : Aug 6, 2020, 11:21 AM IST

अकोला - महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असून परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. कोरोना तपासणी अहवालात बुधवारी दिवसभरात 44 रुग्ण तर रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये 47 असे एकूण 91 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर उपचारानंतर 43 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 2 हजार 800 वर पोहचली आहे. त्यामध्ये 2 हजार 286 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर सध्या 401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 113 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना तपासणी अहवालात 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 21 महिला व 24 पुरुष आहेत. त्यात दाळंबी येथील 9 जण, विठ्ठल नगर मोठी उमरी येथील 5 जण, बोरगाव मंजू व वाडेगाव येथील प्रत्येकी 3 जण, अकोट, डाबकी रोड व आगर येथील प्रत्येकी 2 तर उर्वरित मुर्तिजापूर, संताजी नगर, बार्शीटाकळी, रिधोरा, दहिहांडा, शिवर, संकल्प कॉलनी, कोठारी, केशव नगर व अग्रसेन भवन येथील प्रत्येकी 1 , यांचा समावेश आहे. तसेच रुग्णांमध्ये मलकापूर येथील 4 जण, आगर येथील 3 जण तर बाबुळगाव येथील 2 जण रहिवासी आहेत.

दरम्यान, मंगळवारी रात्री रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये 47 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांचाही समावेश पॉझिटिव्ह अहवाल संख्येत व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. दरम्यान, दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 24 जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून 13 जण, तर हॉटेल रेजेन्सी येथून 6 जण, अशा एकूण 43 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details