शिर्डी - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता साईबाबा मंदिर लवकरात लवकर सुरु करावे, अशी मागणी भाजपचे खासदार सुजय विखे यांनी केली आहे. यासाठी शिर्डीतील पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सह्यांचे पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार असल्याचेही विखे यांनी यावेळी सांगितले
विखे म्हणाले, आंतराष्ट्रीय किर्ती प्राप्त असलेल शिर्डीतील साईबाबा मंदिर गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद आहे. केंद्र सरकारनं प्रार्थना स्थळे खुले करण्याबाबत आधिच अनुमती दिली आहे. मात्र राज्य सरकार निर्णय का घेत नाही? शिर्डीचे सर्व अर्थकारण येणऱ्या भाविकावंर अवलंबून आहे. मात्र मंदिर बंद असल्याने सध्या सर्व व्यवहार ठप्प होताना दिसत आहेत.