जावईबापू आले सासुरवाडीस कोरोना पाहुणा घेऊन, म्हसवडकरांचा जीव टांगणीला - सातारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
मुंबई येथून म्हसवड कोलेवस्तीतील सासुरवाडीस आलेल्या जावईबापूचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने म्हसवड शहरातील नागरिकांची झोपच उडाली आहे. त्याने व त्याची पत्नी आणि मुलगा यांनी मुंबई मधून येताना गर्दीचा फायदा घेऊन हातावर होमक्वारन्टाईन चा शिक्का मारून घेतला होता.
माण (सातारा) - मुंबई येथून म्हसवड कोलेवस्तीतील सासुरवाडीस आलेल्या जावईबापूचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने म्हसवड शहरातील नागरिकांची झोपच उडाली आहे. मुंबईहून आल्यानंतर ही व्यक्ती आपल्या सासुरवाडीत मुक्कामी होती. त्याने व त्याची पत्नी आणि मुलगा यांनी मुंबई मधून येताना गर्दीचा फायदा घेऊन हातावर होमक्वारन्टाईन चा शिक्का मारून घेतला होता. त्यानंतर ते तिघेही कोलेवस्ती वर होमक्वारन्टाईन होते.
या जावईबापूंना त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जावई राहत असलेली वस्तीच नव्हे, तर म्हसवड शहरही हादरून गेले. प्रांत अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, म्हसवड पालिका, पोलीस व आरोग्य विभागाने घटनास्थळी जाऊन वस्तीवरील लोकांना घराबाहेर पडू नका, बाहेरील वा घरातील व्यक्ती कोणीही संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या, आदी सूचना केल्या. तसेच, बाधितांच्या संपर्कातील घरातील तिघे व इतर तिघे यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.