पुणे- महाराष्ट्र शासन एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध सशर्त शिथिल केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. 30 जूनला लॉकडाऊन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. दरम्यान, ठाकरे सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे 30 जूननंतर नव्या सवलती न देता त्याच सवलतीमध्ये पुण्यात 31 जुलैपर्यंत निर्बंध कायम असणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
पुण्यात 'लॉकडाऊन कायम'
पुण्यातील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता, राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे येत्या 31 जुलैपर्यंत नियमांमध्ये कोणतेही बदल न करता लॉकडाऊन कायम राहणार आहे.
आज (दि. 30 जून) संध्याकाळपर्यंत प्रतिबंधित क्षेत्राची पुनर्रचना केली जाणार आहे. लॉकडाऊन नव्या सवलती न देता, आहे त्याच प्रमाणे सुरू राहणार आहे. मिशन बिगिन अगेनच्या दुसऱ्या टप्प्यात पुणेकरांना कोणत्याही नवीन सवलती मिळणार नसल्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले. पुण्यात वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेऊन कोरोना चाचण्या वाढविण्यावर तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर देण्यात येणार आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता पुन्हा कडक निर्बंध लागणार की काय, अशी परिस्थिती पुण्यात असताना आयुक्त शेखर गायकवाड यांनी आत्ताचे निर्बंध 31 जुलैपर्यंत तसेच राहतील, अशी माहिती पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले.
हेही वाचा -लॉटरीच्या आमिषाने ज्योतिष महिलेची फसवणूक, ४ लाख २० हजारांचा गंडा