मुंबई - कोरोनाचा कहर देशभरामध्ये वाढत असतानाच अपरिहार्य ठरलेला लॉकडाऊन केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत वाढवण्याचे ठरवल्यानंतर केंद्रापाठोपाठ आज महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 5 ची नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत कंटेन्मेंट झोन वगळता अन्य झोनमध्ये निर्बधांतून अटी शर्तीसह सूट देण्यात आली आहे.
राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार येत्या 3 जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक देण्यात येणार आहे. राज्यातील कंटेंन्मेंट झोन वगळता व्यवहार सुरळीत करण्यात येणार आहेत.
नव्या मार्गदर्शक सूचना अनुसार काय उघडणार? काय बंद राहणार?
- 3 जूनपासून राज्यात आणखी काहीशी मोकळीक
- कंटेनमेंट झोन वगळता जनजीवन सुरु होणार
- सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम अशा सगळ्यांना परवानगी
- सार्वजनिक मैदानेही खुली होणार
- समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही परवानगी
- धार्मिक स्थळं बंदच राहणार
- स्डेडियम मात्र बंदच राहणार
- फक्त वैयक्तिक व्यायामाला परवानगी, लोकांनी जवळच्या जवळच व्यायाम करण्याचे निर्देश
- लांबच्या प्रवासावर बंदी
- शाळा, कॉलेज महाविद्यालये बंदच राहणार
- मेट्रो बंदच राहणार
- कंटेनमेंट झोनबाहेर जवळपास सर्व उघडणार