महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकनाथ गायकवाडांनी बाईक रॅली काढत केला प्रचाराचा शेवट - काँग्रेस

काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी प्रचारफेरी काढत आज प्रचार संपतेवेळी वडाळा सायन कोळीवाडा येथे बाईक रॅली काढली.

एकनाथ गायकवाडांनी बाईक रॅली काढत केला प्रचाराचा शेवट

By

Published : Apr 27, 2019, 11:22 PM IST

मुंबई - मागील लोकसभेत शिवसेनेने बाजी मारलेल्या दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेना-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई आहे. काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी प्रचारफेरी काढत आज प्रचार संपतेवेळी वडाळा सायन कोळीवाडा येथे बाईक रॅली काढली.

एकनाथ गायकवाडांनी बाईक रॅली काढत केला प्रचाराचा शेवट


एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेला टक्कर देण्यासाठी कंबर कसली असल्याचे दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांना मनसेचाही पाठिंबा मिळत असून मनसे कार्यकर्ते गायकवाड यांच्यासमवेत पदयात्रा, चौकसभांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. गायकवाड यांनी आतापर्यंत माहिम, दादर, धारावी, माटुंगा, नायगाव, माहिम, चेंबूर, सायन कोळीवाडा पिंजून काढला आहे. या ठिकाणी त्यांनी मोठय़ा प्रमाणात जाहीर सभा व चौकसभा घेतल्या आहेत.


गायकवाड यांनी आज प्रचाराची सांगता बाईक रॅली काढत केली. गायकवाड यांनी चेंबूर, सायन कोळीवाडा भागांत पदयात्रा व जाहीर सभा, चौकसभा घेतल्या आहेत. यावेळी मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांचे स्वागत गल्लोगल्ली हारतुरे घालून करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details