महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेरिकेट्स ठरत आहेत डोकेदुखी; वृद्धेला हातगाडीवरच तपासले डॉक्टरांनी - Thane corona effect

जांभळी नाका परिसरात चहूबाजूने महापालिका आणि पोलीस प्रशासनाने बॅरेकेटिंग केल्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

Thane
बेरिकेट्स ठरत आहेत डोकेदुखी; वृद्धेला हातगाडीवरच तपासले डॉक्टरांनी

By

Published : Jul 26, 2020, 1:40 PM IST

ठाणे - कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांना अनेक अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. वृद्ध आणि रुग्णांचे तर आणखी हाल होत आहेत. जांभळी नाका येथील बेरिकेटसमुळे एका वृद्ध महिलेला चक्क हातगाडीवर तपासण्याची वेळ आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य बाजार पेठ येथील जांभळी नाका परिसरात चहूबाजूने महापालिका आणि पोलीस प्रशासनाने बॅरेकेटिंग केल्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

याचाच फटका येथील एका वृद्ध महिलेस बसला आहे. आजाराने ग्रासल्यामुळे स्थानिक वृध्द महिलेस अक्षरशः हातगाडीवर टाकून काही अंतरावर नेण्यात आले. डॉक्टरांना या परिसरात येण्यासाठी अडथळा निर्माण झाल्यामुळे महिलेस काही काळ हातगाडीवरच तपासून पुन्हा घरी पाठवण्यात आले. वृद्ध महिलेस गोळ्या औषध दिले असून महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे स्थानिक सांगत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी तरी जांभळी नाका या भागातील बॅरेकेटिंग हटवा अशी ओरड स्थानिक नागरिक करीत आहे.

हे बेरिकेटस् नागरिकांना रोखण्यासाठी उभारले असले तरी त्यातून अडचणीच्या वेळी नागरिकांना बाहेर पडता यावे असे बेरिकेटस् लावले तर अडचण होणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details