महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑनलाइन शिक्षणाच्या परिपत्रकावरून विद्यापीठ-प्राध्यापकांमधील वाद चव्हाट्यावर - मुंबई विद्यापीठ-प्राध्यापकांमध्ये वाद

कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत वरिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकावरून विद्यापीठ आणि प्राध्यापक संघटनांमध्ये वाद चव्हाट्यावर आला आहे.

मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ

By

Published : Aug 8, 2020, 7:40 AM IST

मुंबई - कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत वरिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकावरून विद्यापीठ आणि प्राध्यापक संघटनांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. कोणतेही प्रशिक्षण नाही, इंटरनेट आदींची सोय कशी आहे, किती विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी सक्षम आहेत, याचा कोणताही डेटा उपलब्ध नसताना विद्यापीठाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकावर 'बुक्टो' या प्राध्यापक संघटनेने तीव्र आक्षेप घेतेले आहेत.

मुंबई विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष वगळता उर्वरित सर्व वर्षांचे वर्ग हे 7 ऑगस्टपासून ऑनलाइन सुरू करण्याबाबत मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन शिक्षणासाठी परिपत्रक काढले होते. मात्र, हे परिपत्रक देताना विद्यार्थ्यांकडे इंटरनेट सुविधा आहे की नाही, याचा कोठेही अभ्यास केलेला दिसत नाही. शिवाय हे शिक्षण कसे आणि किती वेळ द्यायचे, याचा कोणताही आराखडा विद्यापीठाकडे नाही. यामुळे महाविद्यालयांनी हे वर्ग कसे सुरू करायचे असा सवाल 'बुक्टे'चे डॉ. बाळासाहेब साळवे यांनी केला आहे. आम्ही विद्यापीठाला यासाठी पत्र दिले असून त्याचे अजूनही काही उत्तर आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठात मोठ्या प्रमाणात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. त्यातील बहुतांश विद्यार्थी हे गावी गेलेले आहेत, तर शहरी भागात असलेल्या विद्यार्थ्यांचाही कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अडचणीत सापडले आहेत. अशा वेळी या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण कसे देणार, याची कोणतीही माहिती विद्यापीठाने दिली नाही. शिवाय, ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी डेटा पॅकसाठी खर्च कुठून आणायचा हेही स्पष्ट करावे आणि मूळ परिपत्रक सुधारून घ्यावे, अशी मागणीही डॉ. साळवे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details