पालघर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या लोकांना लुबाडण्याचे प्रकार उघड होत आहेत. नालासोपारा येथे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याची परवड थांबलेली नाही. रुग्णवाहिकेची कोरोना महामारीत सुरू असलेली लूट आणि कुटुंबीयांकडे पैशाची असलेली कमतरता पाहता मृतदेहाला थेट एका टॅक्सीच्या टपावर तिरडी बांधून स्मशानभूमीत आणून अंत्यसंस्कार करण्यात आले. ही हृदयाला पिळवटून टाकणारी घटना नालासोपारा पूर्व येथे घडली.
कोरोना इफेक्ट : नालासोपाऱ्यात टॅक्सीच्या टपावरून अंत्ययात्रा - mans dead body by taxi news palghar
नालासोपाऱ्यात राहणाऱ्या एका व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. घरच्यांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, अव्वाच्यासव्वा पैसे मागितले. त्यामुळे, कुटुंबीयांनी तुळींज येथील स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी चक्क एका टॅक्सीचा आधार घेतला. टॅक्सीच्यावर तिरडी बांधण्यात आली व पूर्वेकडील तुळींज, टाकीरोड मार्गावरून स्मशानभूमीत नेण्यात आले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली लुट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनत आहे. एकीकडे कोरोनाचं संकट तर दुसरीकडे आर्थिक अडचण. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील नालासोपाऱ्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली. येथील एका व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. घरच्यांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, अव्वाच्यासव्वा पैसे मागण्यात आले. इतके पैसे देणे कुटुंबियांना शक्य नव्हते. एकीकडे कोसळलेला दुःखाचा डोंगर आणि त्यात अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्यात येणारी अडचण समोर होती. त्यामुळे, कुटुंबियांनी तुळींज येथील स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी चक्क एका टॅक्सीचा आधार घेतला. टॅक्सीच्यावर तिरडी बांधण्यात आली व पूर्वेकडील तुळींज, टाकीरोड मार्गावरून स्मशानभूमीत नेण्यात आले.
कोरोना महामारीमुळे रोजगार, व्यवसायावर झालेले परिणाम, पैशाची चणचण आणि त्यात काही रुग्णवाहिकेकडून सुरू असलेली लूट पाहता अखेर मृतदेह नेण्यासाठी कुटुंबीय पर्याय शोधू लागले आहेत.