मुंबई - धारावीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून धारावीत कोविडसाठी रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. येत्या रविवारपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले 190 खाटांचे हे रुग्णालय असणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
धारावीत ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह 190 खाटांचे कोविड रुग्णालय, रविवारपर्यंत होणार पूर्ण
ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले 190 खाटांचे रुग्णालय धारावीत उभारले जात आहे. धारावीत रुग्ण बरे होण्याचा आकडा वाढत असल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.
धारावीत कोविड रुग्णालय
धारावीत एक हजार सहाशेहून रुग्ण असून आतापर्यंत सातशे रुग्ण बरे होउन घरी परतले आहेत. 5 लाख लोकांचे स्क्रीनिंग धारावीत झाल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. धारावीतील क्वारंटाइन सेंटरमध्ये देखील ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे धारावीत रुग्ण बरे होण्याचा आकडा वाढत असल्याचेही शेवाळे यांनी सांगितले.