सांगली - कोरोना विषाणूचा प्रसार वाढतच असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे पुन्हा एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कडेगाव तालुक्यातल्या नेर्ली येथील 57 वर्षीय व्यक्तीचा मिरजेत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत चार जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 51 वर पोहोचली आहे.
कोरोनामुळे एकाचा मृत्यू, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृतांचा आकडा ४ वर - Corona Update Sangli
कोरोना विषाणूचा प्रसार वाढतच असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे पुन्हा एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे

सदर कोरोना बाधीत व्यक्ती हा कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील आहे. 18 मे रोजी रुग्ण मुंबईहुन सांगली जिल्ह्यात आला होता. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती चिंताजनक बनल्याने रुग्णाला नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान रुग्णाला मधुमेहाचाही त्रास होता.
शनिवारी उपचार सुरू असताना व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत सांगली जिल्ह्यात ४ कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे, ही माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. तर सध्या ५१ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.