ठाणे -महाराष्ट्रातील कोकण प्रांतात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र यंदाच्या उत्साहावर कोरोनाचे संकट उभे ठाकल्याने नियम आणि अटींचे पालन करून उत्सव साजरे केले जात आहेत. एका कोविड रुग्णालयात गणेशोत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. रुग्णांनी गणेश मूर्तीची स्थापना करून गणेशाची आरती करून मोदकाचा प्रसादही मिळविला.
कोविड रुग्णालयात गणेशोत्सवाचा जल्लोष; रुग्णांनी केली आरती
कोविड रुग्णालयात गणेशोत्सवाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे. रुग्णांनी गणेश मूर्तीची स्थापना करून गणेशाची आरती करून मोदकाचा प्रसादही मिळविला.
देशभरासह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. गणेशोत्सवाच्या कालखंडात कोरोनाशी दोन हात करत असलेले कोरोना योध्ये आणि रुग्ण मात्र गणेश उत्सवाच्या उत्साहापासून दूर राहिले होते. त्यातच कल्याण ग्रामीण भागातील दावडी गावात असलेल्या एका कोविड रुग्णालयात नाहर या संस्थेने पुढाकार घेत रुग्णांना लाडू व मोदकाचा प्रसाद देत गणेशोत्सव साजरा केला आहे.
विशेष म्हणजे सर्व रुग्णांनी आणि डॉक्टरांनी रुग्णालयामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. जल्लोषात गेल्या दिवसापासून सकाळ, संध्याकाळ आरती करून कोरोनाचे संकट लवकरच संपवू दे असे साकडे बाप्पाला घातल्याचे सांगितले आहे.