महाराष्ट्र

maharashtra

रद्द विमान प्रवासाचा परतावा द्या; अन्यथा न्यायालयात जाऊ

By

Published : Jun 2, 2020, 2:30 PM IST

ग्राहक पंचायतीने केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षण भारतासह फ्रान्स, जर्मनी, कुवेत, अमेरिका, इंग्लंड आदी देशातील प्रवाशांनी सहभाग घेतला. जवळपास एक हजार सहा प्रवाशांनी भूमिका मांडली. यातील 98 टक्के प्रवाशांना रद्द तिकीटाचा परतावा मिळालेला नाही. त्यांना कंपनीने क्रेडिट शेल देऊ केले आहे. म्हणजेच पुढच्या प्रवासासाठी ही रक्कम गृहीत धरली जाईल. पण 83 टक्के प्रवाशांना हे मान्य नाही.

रद्द विमान प्रवासाचा परतावा
रद्द विमान प्रवासाचा परतावा

मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जगभरातील विमान कंपन्यांनी देशांतर्गत आणि परदेशातील विमान सेवा बंद केली आहे. त्यामुळे यादरम्यान ज्या प्रवाशांचे तिकीट रद्द झाले आहेत, अशा 98 टक्के प्रवाशांना अद्याप परतावा मिळालेला नाही. कंपन्यांनी क्रेडीट शेल देण्याचा पर्याय ठेवला असून हा पर्याय जगभरातील 83 टक्के प्रवाशांनी अमान्य करत याविरोधात न्यायालयात धाव घेण्याची भूमिका घेतली आहे. मुंबई ग्राहक पंचायतीच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

ग्राहक पंचायतीने यासंबंधी एक ऑनलाइन सर्वेक्षण केले आहे. यात भारतासह फ्रान्स, जर्मनी, कुवेत, अमेरिका, इंग्लंड आदी देशातील प्रवाशांनी सहभाग घेतला. जवळपास एक हजार सहा प्रवाशांनी भूमिका मांडली. यातील 98 टक्के प्रवाशांना रद्द तिकीटाचा परतावा मिळालेला नाही, तर यांना कंपनीने क्रेडिट शेल देऊ केले आहे. क्रेडिट शेल अर्थात पुढच्या प्रवासासाठी ही रक्कम गृहीत धरली जाणार आहे.

पण 83 टक्के प्रवाशांना हे क्रेडिट शेल मान्य नाही. त्यांना आपली तिकीटाची रक्कम परत हवी असल्याचे नमूद केले आहे. ही रक्कम परत मिळाली नाही, तर विमान कंपन्यांविरोधात न्यायालयात धाव घेण्याची त्यांची तयारी असल्याचेही मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‌ॅड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details