2022च्या पावसाळ्याातील निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणण्याचा प्रयत्न - थोरात - bhausaheb throat surge factory latest news
अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यात सर्वाधिक कोरोना टेस्ट झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे विलगीकरण करुन त्यांवर उपचार केले जात आहे. सर्वाधिक टेस्टिंगमुळे रुग्णवाढ दिसत आहे.
अहमदनगर -ऊस व दूध हे शाश्वत उत्पादनाचे साधन आहे. आगामी काळात सर्व शेतकर्यांनी एकरी उत्पादन वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांचे जिवनमान उंचविण्यासाठी काम होत आहे. थोरात कारखान्याने या हंगामात विक्रमी ऊस गाळपाची कामगिरी केली आहे. कोरोना संकट असूनही 2022च्या पावसाळ्याातील निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21 गळीत हंगामाची सांगता समारंभात ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आधुनिक प्रणालीचा वापर
सहकारी संस्थांमुळे ग्रामीण विकास होत आहे. ऊस व दूध हे शाश्वत आहे. कारखान्याने यावर्षी 192 दिवसांत विक्रमी 13 लाख 19 हजार मे.टनाचे गाळप केले आहे. कारखान्यावर सभासद, तालुक्यातील व कार्यक्षेत्राबाहेरील शेतकर्यांचा मोठा विश्वास आहे. वेळेत व योग्य भाव हे वैशिष्ट आपण कायम जपले आहे. नवीन कारखाना निर्मितीचा निर्णय हा अत्यंत लाभदायी ठरला आहे. कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी ठिबकसह आधुनिक प्रणालीचा वापर करावा लागेल. कारण कार्यक्षेत्रातील ऊस वाढीनंतर बाहेरील वाहतूकीचा खर्च कमी होऊन जास्त भाव देता येऊ शकतो, असे थोरात म्हणाले.
लॉकडाऊनमुळे अनेक मजूर स्थलांतरित
कारखान्याने सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोरोना संकटात 500 बेडचे कोविड सेंटर सुरू केले तर ऑक्सिजन प्लॅन्ट लवकर सुरू होणार आहे. सर्व सहकारी संस्था या गुणवत्तेने चालविण्यात सामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद निर्माण करणे हाच आपला ध्यास असल्याचे थोरात म्हणाले. तसेच शेतकरी व कार्यकर्त्यांनी आपल्या प्रपंचाशी निगडीत सहकारी संस्था जपल्या पाहिजे. राजहंस दूध संघाने लॉकडाऊनच्या काळात एक दिवसही आपली सेवा बंद ठेवली नाही. शाश्वत भाव दिला. मात्र, दूध उत्पादन कमी झाले, की काही उत्पादक एक रुपयासाठी इतरत्र दूध घालतात हे योग्य नाही. कोरोनाचे मोठे संकट आहे. सरकार अत्यंत पारदर्शकपणे काम करत आहे. अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यात सर्वाधिक कोरोना टेस्ट झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे विलगीकरण करून त्यांवर उपचार केले जात आहे. सर्वाधिक टेस्टिंगमुळे रुग्णवाढ दिसत आहे. तसेच आपल्या जिवनातील अत्यंत महत्वाचे निळवंडे कालव्यांच्या कामासाठी मोठा निधी मिळविला आहे. मागील दीड वर्षात लॉकडाऊनमुळे अनेक मजूर स्थलांतरित झाले आहे. या कामात अडथळे येत आहे. तरी ही 2022च्या पावसाळ्याातील पाणी शेतकर्यांना देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
कार्पोरेट पध्दतीने हा सहकारी साखर कारखान्याचा कारभार
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरच्या सहकाराचा पाया घातला. कारखान्यातील बारीक बारीक गोष्टींमध्ये काटकसर, नवीन तंत्रांचा वापर केला जात आहे. अत्यंत कार्पोरेट पध्दतीने हा सहकारी साखर कारखाना चालविला जात आहे. निळवंडे धरण त्यांच्याच हातून झाले आहे. कालव्यांना मोठा निधी मिळून ते पाणी लवकरात लवकर आणण्यासाठी ते काम करत आहेत, असे आमदार सुधीर तांबे म्हणाले.