मुंबई - कोकणातील काही नेत्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रत्नागिरी जिल्ह्यातील रमेश कदम, उस्मान मोमीन, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शशिकांत मोकल व उषा चौधरी अशी प्रवेश करणाऱ्या नेत्यांची नावे आहेत.
कोकणातील अनेक नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले स्वागत - खासदार शरद पवार
कोकणातील काही नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रत्नागिरी जिल्ह्यातील रमेश कदम, उस्मान मोमीन, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शशिकांत मोकल व उषा चौधरी अशी प्रवेश करणाऱ्या नेत्यांची नावे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रयत्नांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर अनेक नेत्यांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण राजकारण हे बेरजेचे करायचे. वजाबाकी आणि भागाकाराचे नाही, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केले. पक्ष बळकट करण्यासाठी आपले चौफेर प्रयत्न सुरू आहेत. खासदार पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. पक्ष सोडून गेलेल्यांनीही घरवापसीची इच्छा प्रकट केली आहे. त्यामुळे सर्व चांगल्या प्रवृत्तीचे लोक पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून रमेश कदम यांचे पक्षाला पाठबळ लाभले. काही कारणांमुळे मधल्या काळात ते वेगळे झाले. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकणात आता पक्ष मजबुतीसाठी त्यांच्यसोबत पुन्हा जोमाने कामास सुरुवात करू, असे खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार शेखर निकम, सरचिटणीस बसवराज पाटील, माजी आमदार संजय कदम तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.