ठाणे -उत्तर प्रदेश येथील हाथरस अत्याचार प्रकरणाचा सर्वत्र निषेध होत असतानाच आज ठाण्यात युवासेनेकडून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ठाणे युवासेनेकडून योगी आदित्यनाथ यांना टपालाच्या माध्यमातून साडी व बांगड्या पाठवण्यात आल्या. देवीच्या प्रतिमेची आरती करुन पीडित तरुणीला न्याय मिळावा व संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
युवा सेनेने योगी आदित्यनाथांना पाठवाल्या साडी-बांगड्या - ठाणे युवा सेना हाथरस प्रकरण निषेध बातमी
भाजप नेते या प्रकरणावर गप्प का असा प्रश्न विचारत योगी आदित्यनाथ यांना स्वतःच राज्य सुरक्षित ठेवता येत नाही. यासाठी त्यांना साडी आणि बांगड्या पाठवण्यात आल्याचे युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक राहुल लोंढे यांनी सांगितले. आंदोलनात मोदी सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारचा निषेध करत घोषणा बाजी करण्यात आली.
युवा सेनेने योगी आदित्यनाथांना पाठवाल्या साडी-बांगड्या