महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशीत तरुणावर ५ जणांचा अनैसर्गिक अत्याचार, प्रकृती चिंताजनक

एका ३४ वर्षीय तरुणाला पाच नराधम तरुणांनी तेथील कांदळवनात नेऊन त्याच्यावर सामूहिक अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी वाशी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्या नराधमांचा शोध घेत आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 26, 2019, 4:09 PM IST

Updated : Sep 26, 2019, 7:21 PM IST

ठाणे- एका ३४ वर्षीय तरुणाला पाच नराधम तरुणांनी तेथील कांदळवनात नेऊन त्याच्यावर सामूहिक अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वाशीतील जागृतेश्वर तलावाजवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. संतापजनक बाब म्हणजे हे पाच नराधम तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित तरुणाच्या पार्श्वभागात जबरदस्तीने नारळाची अर्धवट करवंटी, निरोध व इतर वस्तू टाकून अमानवी कृत्य केले. त्याचा छळ करून घटनास्थळावरून पळ काढला.

वाशीत तरुणावर ५ जणांचा अनैसर्गिक अत्याचार

हेही वाचा - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत गावठी कट्ट्यासह एकाला अटक


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण तुर्भे परिसरात राहण्यास आहे. तो सोमवारी सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे वाशीतील जागृतेश्वर तलाव घाट क्र. २ येथे गेला होता. या वेळी तो मोबाइलवर बोलत उभा होता. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या २५ ते ३० वयोगटातील पाच नराधमांनी जबरदस्तीने त्याला टाटा कॉलनी व जागृतेश्वर तलाव घाटालगत कांदळवनाच्या झुडपात नेले. त्यानंतर या नराधमांनी पीडित तरुणावर अनैसर्गिक अत्याचार केला. नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित तरुणाच्या पार्श्वभागात नारळाची अर्धवट करवंटी, निरोध व इतर वस्तू टाकून अमानवी कृत्य केले. त्यानंतर त्याला त्याच ठिकाणी जखमी अवस्थेत सोडून पळ काढला.

हेही वाचा - लोकलचा कुख्यात 'फटक्या' जेरबंद, महिला प्रवाशांमध्ये होती मोठी दहशत

या संतापजनक घटनेनंतर पीडित तरुणाने जखमी अवस्थेत आपले घर गाठल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला कोपरखैरणेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करून त्याच्या पार्श्वभागातील वस्तू बाहेर काढल्या. पीडित तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, पीडितेच्या जबाबावरून वाशी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत पाचही नराधमांवर गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचा - दाऊदचा हस्तक सांगून महापौरांना धमकावणाऱ्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पीडित पुरुषाच्या मित्रांनी थेट पोलीस आयुक्त संजय कुमार यांना पत्र देऊन या गंभीर प्रकाराची दखल घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे समाजात फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषही सुरक्षित नसल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.

Last Updated : Sep 26, 2019, 7:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details