ठाणे - भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील दापोडा गावच्या हद्दीत घडली.
संजय सिंगासन गुप्ता (वय, ३१ रा.घाटकोपर ) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. भूषण मधुसुदन पंड्या (४२ रा.ऑगस्टक्रांती मैदान,नानाचौक,मुंबई.) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे.
भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील दापोडा गावच्या हद्दीत घडली.
जिल्ह्यात संचारबंदी व लॉकडाऊन असताना काल रात्रीच्या सुमाराला आरोपी कारचालक भूषण हा भिवंडी तालुक्यातील दापोडा गावच्या हद्दीतील रस्त्यावरून जात होता. त्यावेळी त्याने रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून कार भरधाव वेगात चालवून दुचाकीस्वार संजय याला जोरदार धडक दिली. या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अति रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कारचालक भुषण याच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पराग भाट करत आहेत.