ठाणे- मित्रांसोबत कामवारी नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भिवंडी तालुक्यातील शेलार गावालगत असलेल्या कामवारी नदीच्या पात्रात ही घटना घडली . सलमान अंसारी ( वय २० वर्षे रा. खाडीपार, भिवंडी) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मृत सलमान हा त्याच्या अन्य दोन मित्रांसोबत अंघोळीसाठी शेलार गावाच्या हद्दीतील शारदा विद्यालयाच्या पाठिमागील कामवारी नदीच्या पात्रात मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी गेला होता. मात्र, यावेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सलमान पाण्यात बुडू लागला. त्याच्या नका तोंडात पाणी गेल्याने त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, नदीच्या वाहत्या प्रवाहात तो वाहून गेला आहे.