महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मिनी बसने तरुणाला 100 मीटर फरफटत नेले; बस चालकावर गुन्हा - बसच्या धडकेत तरुण जखमी

पीडित तरुण बस चालकाशी बोलत असताना वाद झाला. त्यावेळी बस चालकाने बस सुरू करीत भरधाव वेगाने पुढे नेली. मात्र त्यावेळी बसला धरून उभा असलेला तरुण तब्बल 100 मीटर बससोबत फरफटत गेला.

'ई टीव्ही भारत'ने
'ई टीव्ही भारत'ने

By

Published : Jan 20, 2021, 6:47 AM IST

ठाणे - शहराच्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मिनी बस चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत एका तरुणाला 100 फरफटत नेल्याचे घटना रविवारी घडली. यानंतर कासारवडवली पोलिसांनी जखमी तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल केले. तसेच या प्रकरणी बस चालक मन्सूर अली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र फड यांनी या घटनेची माहिती दिली.

रविवारी रात्री हा पीडित तरुण बस चालकाशी बोलत असताना वाद झाला. त्यावेळी बस चालकाने बस सुरू करीत भरधाव वेगाने पुढे नेली. मात्र त्यावेळी बसला धरून उभा असलेला तरुण तब्बल 100 मीटर बससोबत फरफटत गेला. तरुणाने या दरम्यान बसच्या खिडकीला पकडले होते. बसने फरफटत नेल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी बस चालक मन्सूर अली याच्यावर मोटरवाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

बस चालकांची मुजोरी सुरुच-

ठाण्यात घोडबंदर रोडवर दररोज लाखो लोक प्रवास करतात, त्यांना या बस चालकांची मुजोरी पाहायला मिळते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या आणि परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे ही मुजोरी मोडली जात नाही. कठोर कारवाई केल्यास या आणि अशा प्रकाराला आळा बसु शकतो, असे प्रवासी सांगत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details