ठाणे- देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएए, एनआरसी व एनपीआर विरोधात आंदोलन सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेस बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून केंद सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.
ठाण्यात युवक काँग्रेसची 'एनआरयू' मोहीम, भाजपला घेरण्यासाठी देशभर होणार आंदोलन - National Registration Unemployment
देशभरात युवक काँग्रेने एनआरयु (नॅशनल रजिस्ट्रेशन अनएम्प्लॉयमेंट) मोहीम सुरू केली आहे. यातून काँग्रेस भाजपला घेरण्याच्या तयारीत आहे.

मोहिमेत सहभागी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते
माहिती देताना आशिष गिरी
माझ्याकडे डीग्री आहे पण, नोकरी नाही, कुठे आहे रोजगार? असा सवाल करत युवक काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बेरोजगारी नोंदणी (एनआरयू) ही देशव्यापी मोहीम सुरू केली. महाराष्ट्रात युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आशिष गिरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - भारत बंद : कांजुरमार्ग स्थानकावर लोकल रेल्वे अडविण्याचा प्रयत्न
Last Updated : Jan 29, 2020, 12:31 PM IST