मीरा भाईंदर (ठाणे) - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. उद्या होणाऱ्या भारत बंदला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. भाईंदर पश्चिममध्ये युवक काँग्रेसने केंद्र सरकारची प्रेत यात्रा काढून निषेध नोंदवला. यावेळी काही काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
उद्या भारत बंदची हाक दिली आहे. वेगवेगळ्या राज्यातून शेतकऱ्याना चांगला प्रतिसाद मिळत आहे. काल अकाली दलाच्या नेत्यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली व बंद संदर्भात चर्चा झाली. राज्यातील महाविकास आघाडीनेदेखील पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदा रद्द करा ही प्रमुख मागणी करत आहेत. मात्र आता देशात भाजपच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहे.