नवी मुंबई - सीबीडी बेलापूर येथील पोलीस आयुक्तालयासमोर एका तरुणाने स्वत:च्या अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संबंधित तरुणाला सीबीडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नितीन रांजणे असे या तरुणाचे नाव आहे.
रुणाचा अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवत असल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न -
घणसोली येथील नितीन रांजणे या माथाडी कामगारावर विनयभंगाची तक्रार दाखल आहे. मात्र, ही तक्रार खोटी असून आपल्याला विनाकारण या प्रकरणात अडकवत असल्याचे या तरुणाचे म्हणणे आहे. याबाबत आपण पोलीस आयुक्तालयात तक्रारही केली. त्याची कुणी दखल घेतली नाही. त्यामुळे शेवटी नवी मुंबई पोलीस आयुक्तालया समोर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, असे या तरुणाचे म्हणणे आहे.
पोलिसांनी वेळीस रोखले -
नितीन रांजणे पोलीस आयुक्तालयासमोर डिझेल ओतून घेत असताना बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला तत्काळ अडवून ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. राष्ट्रादीच्या नेत्यांच्या दबावाने पोलीस तक्रार होत असल्याचेही या तरुणाचे म्हणणे आहे.