ठाणे - दारात खोकल्याच्या वादातून तरूणाला मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप कल्याणच्या बंदरपाडा-शहाड परिसरात काही नागरिकांनी केला. मात्र, खडकपाडा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला आहे. गणेश गुप्ता असे मृत तरुणाचे नाव आहे. कल्याण डोंबिवली अनेक भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
दारात खोकल्याच्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची चर्चा मात्र पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद - thane murder
दारात खोकल्याच्या वादातून तरूणाला मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप कल्याणच्या बंदरपाडा-शहाड परिसरात काही नागरिकांनी केला. मात्र, खडकपाडा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला आहे.

गणेश गुरुवारी सकाळच्या सुमारास रेशन घेऊन घराच्या दिशेने सायकलने जात होता. त्यावेळी त्याला त्रास होत असल्याने त्याने सायकल एका ठिकाणी उभी करून एका दारात बसला होता. तो दारात बसल्याने परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याला बसण्याचे कारण विचारून गणेशवर समोरील व्यक्तीने संशय घेतला. तो कोणाला बोलविण्यासाठी गेल्याने गणेशने तेथून पळ काढला. काही अंतरावर गणेश एका गटारात पडला. त्यांनतर आसपासच्या नागरिकांनी त्याला घरी नेले. मात्र, त्यांची तब्येत अचानक खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. काही नागरिकांचे म्हणणे आहे की, गणेश खोकल्याने काही लोकांनी त्यांना मारहाण केली, या मारहाणीनंतर घाबरलेल्या गणेशचा मृत्यू झाला.
दरम्यान,अचानक घडलेल्या या प्रसंगाने मात्र परिसरात अफवांना ऊत आला आहे. शहाड परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, पोलिसांनी त्या आधारावर तपास सुरु केला आहे. तर गणेशचा मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर सत्य समोर येणार आहे.