महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऐन लग्न समारंभात किरकोळ वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत - young man murdered in marraige in ulhasnagar thane

उल्हासनगर कॅम्प नंबर १ मधील मोनिका मॅरेज हॉलमध्ये लग्नासाठी मृत हा त्याचा नातेवाईक रवी मंजुळे याच्या लग्नासाठी आला होता. लग्न समारंभ सुरू असताना मृताचे एका व्यक्तीसोबत काही कारणावरून वादविवाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले.

Dead
मृत

By

Published : Dec 19, 2019, 9:44 PM IST

Updated : Dec 19, 2019, 11:39 PM IST

ठाणे - लग्न समारंभात किरकोळ वादातून एका तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगरातील मोनिका मॅरेज हॉलमध्ये घडली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी सुरेश शिंदे असे मृत तरूणाचे नाव आहे.

ऐन लग्न समारंभात किरकोळ वादातून तरुणाचा खून

उल्हासनगर कॅम्प नंबर १ मधील मोनिका मॅरेज हॉलमध्ये लग्नासाठी मृत रवी हा त्याचा नातेवाईक रवी मंजुळे याच्या लग्नासाठी आला होता. लग्न समारंभ सुरू असताना त्याचे एका व्यक्ती सोबत काही कारणावरून वादविवाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला कि, आरोपीने त्याच्या एका परप्रांतीय साथीदाराच्या मदतीने रवीला बेदम मारहाण करीत त्याचा गळा आवळला. घटनेत तरुणाचा रवीचा मृत्यू झाला. यानंतर त्याला नातेवाईकांनी मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचासाठी नेले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा -पतीने मित्रांना करायला लावला स्वतःच्या पत्नीवर बलात्कार; मुंबईतील उद्योजक पतीला अटक

दरम्यान, आरोपीने लग्न समारंभातून पळ काढला होता. यासंदर्भात उल्हासनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी 3 पथके रवाना केली होती. यात पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना 4 तासात डोंबिवलीतून अटक केली. विशेष म्हणजे मृत आणि आरोपी दोन्ही नातेवाईक आहेत.

Last Updated : Dec 19, 2019, 11:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details