ठाणे - इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील लॉबीमधून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. विनय विनोद गुरव (वय 40, रा. सृष्टी सोसायटी, कासारवडवली) असे मृत तरुणाचे नाव आहे. विनयची ही आत्महत्या की, अपघात याचा तपास कासारवडवली पोलिसांकडून सुरू आहे.
ठाण्यात बाराव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू - विनय विनोद गुरव मृत्यू बातमी
कासारवडवली येथील सृष्टी सोसायटी येथे राहणाऱ्या विनयला हेरिटेज वाहनांचा संग्रह करण्याचा छंद होता. त्याचबरोबर त्याला व्यायामाचीही आवड होती. मात्र, गेले काही दिवस व्यसनांच्या आहारी गेल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते.
हेही वाचा-लंडन ब्रिज हल्ला : हल्लेखोर पोलिसांकडून ठार; चाकू हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू
कासारवडवली येथील सृष्टी सोसायटी येथे राहणाऱ्या विनयला हेरिटेज वाहनांचा संग्रह करण्याचा छंद होता. त्याचबरोबर त्याला व्यायामाचीही आवड होती. मात्र, गेले काही दिवस व्यसनांच्या आहारी गेल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वाघबीळ येथील सुरज वॉटर पार्कनजीकच्या रोझा बेला या इमारतीत जेवण घेण्यासाठी तो गेला होता. तेव्हा, इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील लॉबीमध्ये जाऊन त्याने थेट इमारतीखाली उडी मारली. यात गंभीर जखमी झाल्याने विनय याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.