सिनेमा सुरु असतानाच चित्रपटगृहात टवाळखोर त्रिकुटाकडून तरुणाला बेदम मारहाण; आरोपींचा शोध सुरू - भिवंडी पावनखिंड चित्रपटावेळी तरुणाला बेदम मारहाण
पावनखिंड चित्रपट पाहत असताना तीन तरुण आरडा-ओरडा करत होते. यावेळी त्या अज्ञात तरुणांनी सौरभ भोईर या तरुणाला मारहाण केली. इतकेच नाही तर त्याच्या अंगावर काचेच्या बाटली फेकून मारली. यामुळे सौरभ गंभीर जखमी झाला. त्यांतर त्याने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली.
ठाणे - पावनखिंड चित्रपट सुरु असतानाच चित्रपटगृहात गोंधळ घालणाऱ्या टवाळखोर त्रिकुटाला जाब विचारल्याच्या वादातून तरुणाला चित्रपटगृहात बेदम मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना भिवंडीतील हसीन-फरहान चित्रपटगृहात घडली. याप्रकरणी अज्ञात टवाळखोर त्रिकुटाविरोधात विविध कलमानुसार निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. सौरभ पांडुरंग भोईर (वय 24) असे मारहाणीत गंभीर जखमी जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काचेचे ग्लास फेकून मारल्याने सौरभ गंभीर ..
जखमी सौरभ हा भिवंडी तालुक्यातील भरेगावाचा रहिवाशी आहे. तो आणि त्याचा मित्र रंजित पाटील दोघेही काल दुपारी हसीन - फरहान चित्रपटगृहात पावनखिंड सिनेमा पाहण्यासाठी आले होते. त्याच्या मागच्या सीटवर तीन टवाळखोर तरुण चित्रपट सुरू असतानाच आरडाओरड करत होते. त्यामुळे सिनेमा पाहण्यास व्यत्यय येत असल्याने सौरभने त्या तिघांना ओरडू नका आम्ही चित्रपट पाहत आहोत, असा जाब विचारला होता. यावरून त्या अज्ञात हल्लेखोर तरुणांना राग येऊन त्यांनी सौरभला चित्रपटगृहातच लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करण्यास सुरु केले. मात्र अचानक मारहाण होत असल्याचे पाहून सौरभ व रंजित हे दोघेही चित्रपटगृहा बाहेर आले. त्यावेळी त्या हल्लेखोरांनी आवारात उभ्या असलेल्या लींबू सोड्याच्या हातगाडीवरील काचेचे ग्लास सौरभला फेकून मारले असता ग्लास फुटून त्याच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत होऊन तो रक्तभंबाळ झाल्याचे पाहून तिघा हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. तर गंभीर जखमी अवस्थेत सौरभला त्याचा मित्र रंजितने रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्या हल्लेखोर त्रिकुटाचा शोध सुरु केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर पाटील करत आहेत.