ठाणे- भारतीय रिझर्व्ह बँकेने कंपनी सुशासन आणि कर्ज वितरणातील अनियमिततेमुळे येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. महिनाभरात केवळ 50 हजार रुपये काढण्याची मुभा खातेदारांना दिल्याने जिल्ह्यातील हजारो खातेदार हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ शहरातील येस बँकेच्या विविध शाखांवर पैसे काढण्यासाठी खातेदारांची झुंबड उडाली आहे.
पैसे काढण्यासाठी बॅंकेबाहेर झुंबड हेही वाचा-१५०० आदर्श शाळांसाठी पाच हजार कोटींचा प्रकल्प; तरतूद मात्र शून्य
कल्याणमधील रामबाग परिसर, भिवंडीतील धामणकर नाका आणि उल्हासनगर केम्प 3 परिसरात असलेल्या येस बँकेच्या शाखेबाहेर खातेदारांनी पैसे काढण्यासाठी सकाळपासून एकाच गर्दी केली होती. विशेष म्हणजे भिवंडी शहरातील यंत्रमागधारकांचे बचत खाते अधिक असल्याने त्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम होणार असल्याने ते अधिक चिंताग्रस्त झाले. तर उल्हासनगरमध्येही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा व्यापाऱ्यावर परिमाण होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील येस बँकेच्या विविध शाखे बाहेर खातेदारांनी सकाळपासून गर्दी केली असतानाच गुरुवारी सायंकाळी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय जाहीर केल्यानंतर रात्री उशिरा बँकेच्या एटीएम बाहेर सुध्दा गर्दी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी बँक व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे चोरीच्या भीतीने बँकेत पैसे ठेवावेत तर तेथे सुध्दा पैसे सुरक्षित राहत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक कसा सुरक्षित राहील, अशी भीती बँक ग्राहकांनी व्यक्त केली आहे.