ठाणे :विश्वनाथन आनंद यांनी एकाचवेळी 22 जणांचा बुद्धिबळामध्ये मुकाबला केला. खरे तर त्यांनी राजकारणात यायला हवे होते. राजकारणात देखील एकाचवेळी कित्येक विरोधकांचा मुकाबला करावा लागत असतो. त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात काही अडीच घरे चालणारे घोडे असतात तर काही हत्ती असतात. एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात.
राजकारणातला बुद्धिबळ खेळणं सोप्प मात्र... :गेल्या एक वर्षापासून अनेकजण चेकमेट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र त्यांचे स्वप्न साकार होत नाही. विरोधकांनी आपली बुद्धी किती पणाला लावली; मात्र जनतेचा पाठिंबा माझ्यासोबत आहे. त्यामुळे सतत विरोधक चितपट होत आहेत. राजकारणातला बुद्धिबळ खेळणं सोप्प आहे; मात्र जगात स्वतःची मुद्रा उमटणे फार कठीण आहे.
आम्ही राजकारणातले ग्रॅंडमास्टर :विश्वनाथन आनंद यांनी बुद्धिबळामध्ये प्राविण्य साध्य केले. आम्ही जी क्रांती केली त्यामुळे आम्हाला राजकारणातले ग्रँडमास्टर म्हणतात; मात्र खरे ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद. आमच्या देखील ठाण्यात ग्रँड मास्टर त्यांचे नाव धर्मवीर आनंद दिघे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. भारताचा सुप्रसिद्ध बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने कोरम मॉल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त २२ कुशल बुद्धिबळपटूंसोबत एकाचवेळी बुद्धिबळ खेळण्याचे आव्हान स्वीकारले. बुद्धिबळ प्रेमींसाठी बुद्धी आणि कौशल्य यांचा एक अनोखा आणि विलक्षण नजराणाच सादर करत चितपट केले. विश्वनाथन आनंद आणि कार्यक्रम रोटरी क्लब, ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप अकॅडेमी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले.
अंधारेंकडून मुख्यमंत्री पदाविषयी साशंकता: विरोधकांकडून वर्षभरापासून चेकमेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांचा हा दावा काही प्रमाणात खरा देखील आहे. अलीकडेत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, भाजपावाले काय बोलतील आणि काय करतील याचा काही एक नेम नाही. यामुळेच आता एकनाथ शिंदे हे किती दिवस मुख्यमंत्री राहतील, हे काही सांगता येत नाही. त्यांच्याच पक्षातले वाचाळ आता एकनाथ शिंदेंचे काही खरे नाही, असे बोलत सुटले असल्याचे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अमरावतीत म्हटले आहे.
हेही वाचा:
- Sharad Pawar : मणिपूरमध्ये मोदी सरकार बघ्याच्या भूमिकेत, पंतप्रधानांनी तेथे जायला हवे, शरद पवार मोदींवर बरसले
- Nana Patole : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा - नाना पटोले
- Raj Thackeray News: रस्ते करताना सरकारला भीती वाटेल असे आंदोलन करा - राज ठाकरे