Year Ender 2021 Of Ulhasnagar: सरत्या वर्षीही गुन्हेगारीचा आलेख चढताच; इमारती कोसळण्याच्या घटनांमुळेही चर्चेत राहिली उद्योग नगरी उल्हासनगर - माजी आमदार पप्पू कलानी
उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर परिमंडळ क्षेत्रात सत्तरच्या दशकापासून लागले गुन्हेगारींचे ग्रहण कायम असल्याचे दिसून आले आहे. सरत्यावर्षीही गुन्हेगारीचा चढता आलेख राहिला आहे. भर रस्त्यावर पळवत 'मुळशी पॅटर्न' स्टाईलने दोन टोळी युद्धात हत्या, भर चौकात होणाऱ्या हाणामाऱ्या, घरफोड्या, गुंडांकडून वाहनांची तोडफोड, असे शेकडो गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे 2021 या सरत्या वर्षात आतापर्यंत 17 जणांच्या हत्याने उद्योग नगरी उल्हासनगरला ( Year Ender 2021 Of Ulhasnagar ) हादरून सोडले.
ठाणे -उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर परिमंडळ क्षेत्रात सत्तरच्या दशकापासून लागले गुन्हेगारींचे ग्रहण कायम असल्याचे दिसून आले आहे. सरत्यावर्षीही गुन्हेगारीचा चढता आलेख राहिला आहे. भर रस्त्यावर पळवत 'मुळशी पॅटर्न' स्टाईलने दोन टोळी युद्धात हत्या, भर चौकात होणाऱ्या हाणामाऱ्या, घरफोड्या, गुंडांकडून वाहनांची तोडफोड, असे शेकडो गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे 2021 या सरत्या वर्षात आतापर्यंत 17 जणांच्या हत्याने उद्योग नगरी उल्हासनगरला ( Year Ender 2021 Of Ulhasnagar) हादरून सोडले आहे.
- गुन्हेगारांना सोन्याची अंडी देणारे शहर, अशी उद्योग नगरीची ओळख :उल्हासनगर पोलीस परिमंडळ हद्दीत बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या प्रमुख शहरासह ग्रामीण भागाचा मोठा समावेश आहे. या तिन्ही शहरासह ग्रामीण भागात छोटो-मोठे, असे लाखो कारखाने आणि लघु उद्योग आहेत. उल्हासनगर शहरात माजी आमदार पप्पू कलानी यांनी सत्तरच्या दशकात राजकारणात प्रवेश करून ते शहराचे नगराध्यक्ष झाले होते. त्यानंतर हळूहळू उद्योग नगरीला गुन्हेगारीची ग्रहण लागले. गुन्हेगारांना सोन्याची अंडी देणारे शहर असल्याचे वाटत या भागात गुन्हेगारांचा वावर वाढला. 80 च्या दशकात याच शहरातून गँगस्टर सुरेश पुजारीचा ( Gangster Suresh Pujari ) उदय झाला. तेव्हापासूनच धमक्यांचे सत्र सुरू झाले. कालांतराने अनेक गुन्हेगारांच्या छोट्या मोठ्या टोळ्या तयार झाल्या होत्या. त्यातच एकमेकांच्या टोळी युद्धात अनेक गुंडाचा खात्मा झाला आहे. तर माजी आमदार पप्पू कलानीवरही त्याकाळी हत्येसारखे गंभीर गुन्हे दाखल झाले. देशात गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी टाडा कायदा संसेदत पारित केला होता. त्याच टाडा कायद्या अंतर्गत माजी आमदार पप्पू कलानींवर ( Former MLA Pappu Kalani ) कारवाई करण्यात आली होती. सध्या इंदर भटीजा हत्येप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेला पप्पू कलानी पत्नी माजी आमदार ज्योती कलानीच्या निधनानंतर पॅरोलवर सुटला असून शहरात पुन्हा राजकीय बस्तान बसविण्यासाठी आटापिटा करत असल्याचे दिसून आले.
- गँगस्टर सुरेश पुजारीचा उदयही उद्योग नगरीतूनच :फिलिपाईन्समधून गँगस्टर सुरेश पुजारीला ( Gangster Suresh Pujari ) दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर ठाणे जिल्ह्यासह मुंबई परिसरात सुमारे 38 गंभीर गुन्हे दाखल आहे. गॅंगस्टर होण्यापूर्वी उल्हासनगरमधील डायमंड बार आणि मंदाताईंच्या ढाब्यावर वेटर म्हणून काम करणारा सुरेश पुजारी हा याच उद्योग नगरीत वेटर ते खंडणीखोर, गँगस्टर झाला. त्याने 1993 साली पहिला खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्यावेळी उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी परिसरात दाखल झाला. शिवाय सुरेश पुजारीने उल्हासनगर मधीलच केबल व्यवसाय करणाऱ्या सच्चानंद करीरा याची हत्या करून अंडरवर्ल्डमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर या पोलीस परिमंडळ हद्दीत अनेक शार्प शूटरचे जाळे सुरेश पुजारीने पसरवून गुन्हेगारी क्षेत्रात बस्तान बसवले होते.
- 48 गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई :उल्हासनगर परिमंडळ हद्दीत गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत 48 गुन्हेगारांना तडीपार ( Crime Rate Of Ulhasnagar ) केले आहे. महिन्याभरापूर्वी दुपारी रस्त्यावर पळवत नशेत धुंद असलेल्या पाच जणांनी सुशांत उर्फ गुड्ड्या गायकवाड याची कॅम्प 4 येथील दिपक दरबार येथे हत्या केली. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी कॅम्प 4 येथील सोंग्याची वाडी येथे ज्ञानेश्वर सोनवणे याचा त्याचाच मित्र सुरज शिंदेने खून केला. उल्हासनगर कॅम्प 2 भागात राहुल शूज नावाचे दुकान आहे. 5 ते 6 जणांच्या टोळीने लोखंडी रॉड, हॉकीने दुकानाचे मालक दिपक गोखलानी आणि काम करणाऱ्या दिपक छाब्रिया यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. फ्लॅट विक्रीच्या सौद्यावरून प्रॉपर्टी दलालांनी 70 वर्षीय वयोवृद्ध मधू गोवलानीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. मागील आठवड्यात गांजा विक्रेत्या अनिल शेट्टी याची त्याच्याच मित्र रवी आणि त्याच्या साथीदाराने हत्या केली.
- सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांची जोरदार मोहीम :झोपडपट्टी दादा यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली. सराईत गुन्हेगार, हिस्टरी शिटर यांनी नजिकच्या काळात केलेल्या कारवायाचा लेखाजोखा तयार करून कारवाई सुरू केली. पहिल्याच टप्प्यात मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 11 गंभीर गुन्हे असलेला अनिल धिवरे आणि 16 गंभीर गुन्हे असलेला प्रेमचंद उर्फ बाबू मनोहर ढकणी तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 8 गंभीर गुन्ह्यात समावेश असलेला स्वप्निल कानडे आणि उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 9 गंभीर गुन्हे दाखल असलेला जग्गू सरदार उर्फ जगदीश तिर्थसिंग लाबाना यांवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कारवाई ( Maharashtra Prevention of Dangerous Activities Act ) करण्यात आली. या कारवाई अंतर्गत एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
- इमारत दुर्घटनेत 13 जणांचा बळी, पुनर्बांधणीचा प्रश्नही ऐरणीवर :उल्हासनगरमधील मोहिनी पॅलेस इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना ( Slab Collapsed ) घडली होती. या दुर्घटनेत 5 जणांचा बळी घेणाऱ्या बांधकाम विकासकावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात ( Ulhasnagar Police ) पालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या तक्रारीवरून महिन्याभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापाठोपाठ साईशक्ती इमारतीचाही स्लॅब कोसळून 7 जणांचा जीव गेला होता. तर एका दुर्घटनेत एकाचा, असे 13 जणांनी जीव गमावला लागला आहे. यापूर्वी इमारतीचे स्लॅब पडून मृत्युमुखी पडलेल्या इमारत विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त व धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीची मागणी होत आहे. शहरात धोकादायक इमारतीची संख्या लाक्षणीय असल्याने, पुनर्बांधणीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
- धोकादायक इमारतींच्या यादीवरही प्रश्नचिन्हउल्हासनगर महापालिकेने एकूण 147 इमारती धोकादायक असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले असून त्यापैकी 23 इमारती अतिधोकादायक आहेत. 23 पैकी 18 अतिधोकादायक इमारती रिकाम्या असून, अन्य इमारतींमधील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. धोकादायक इमारतींच्या यादीव्यतिरिक्त इतर इमारतींचे स्लॅब कोसळून नागरिकांचे बळी जात असल्याने, धोकादायक इमारतींच्या यादीवरही प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. अखेर महापालिकेने 10 वर्षे जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेऊन इमारतींना नोटीस दिल्या आहेत. तर सरकारने खास शहरासाठी काढलेल्या अध्यादेशाअंतर्गत धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी होऊ शकते का.? याबाबतचा प्रश्न जैसे थे असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
- उल्हासनगर ( Ulhasnagar ) शहरातील अनिल अशोक चित्रपटगृहाजवळ फॉरवर्ड लाईन रोडवर शुक्रवारी (दि. 26) रात्रीच्या सुमारास तीन आरोपींनी जो भेटेल त्याला मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, मध्यवर्ती पोलीस ( Police ) ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाच जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उल्हासनगर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसून या गुंडांची दहशत कमी करण्यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर येत, आरोपींची शहरात रस्त्यावर फिरवत वरात काढली.
- भाजपा आमदाराच्या मर्सिडीज कारवर हल्लाउल्हासनगर विधानसभेचे भाजपाचे आमदार कुमार आयलानी यांचा मुलगा धीरज आयलानी हा मर्सिडीज (क्र. MH-O5-DH-5555) ही आलिशान कार कार घेऊन उल्हासनगर महापालिकेच्या मागील बाजूस आंबे स्पोर्ट क्लबजवळ उभा होता. त्यावेळी अचानक एका तरुणाने दगडाने गाडीवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली. तर सुदैवाने या हल्ल्यात आमदाराचा मुलगा धीरज आयलानी हा थोडक्यात बचावला. परंतु मर्सिडीज कारचे नुकसान झाले होते.
- पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्याची थेट नदीत उडीउल्हासनगर पोलीस परिमंडळ ४ मध्ये दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसाला ४ ते ५ दुचाकी चोरीला जात असल्याचे विविध पोलीस ठाण्यातील नोंदीवरून समोर आले. उल्हासनगरात दोन दुचाकी चोर दुचाकी चोरून अंबरनाथच्या दिशेने येत असता चोरलेल्या दुचाकीचा मालक दुसऱ्या दुचाकीवरून या चोरट्यांचा पाठलाग करत होता. त्याच सुमारास चोरलेली दुचाकी रस्त्यावर अचानक घसरल्याचे पाहून दोन्ही चोरट्यांनी पळ काढला. दरम्यान दोघांपैकी एकाने थेट नदीत उडी घेऊन दुचाकी मालकाला चकमा देण्याचा प्रयत्न केला.
- उल्हासनगरच्या फायर ब्रिगेड ऑफिसरसह चौघांना शौर्य पदक जाहीरउल्हासनगर महानगरपालिकेतील फायर ब्रिगेडच्या दलातील ४ कर्मचाऱ्यांना 'राष्ट्रपती शौर्य पुरस्कार' (Presidential Bravery Award) जाहीर झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या या पुरस्कारांमुळे उल्हासनगर (Ulhasnagar) शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. उल्हासनगर अग्निशमन दलाचे चीफ फायर ऑफिसर बाळू नेटके, डेप्युटी फायर ऑफिसर पंकज पवार, स्टेशन फायर ऑफिसर संदीप आसेकर व राजेंद्र राजन अशी राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालेल्या जवानांची नावे आहेत.