ठाणे - कन्सट्रक्शन् ,पिदी, मी घोडा हुसेनच्या चित्रातला, रायाची रापी अशा अनेक एकांकिका. तसेच इमला,रज्जू, चौकोन इत्यादी अनेक पुरस्कार प्राप्त नाटकांचे लेखक ज्येष्ठ रंगकर्मी वामन तावडे यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी मुलुंड येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. चार दिवसांपूर्वी त्यांना छातीत दुखत असल्या कारणाने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर तिथेच काल त्यांची प्राणज्योत मावळली.
नाटककार वामन तावडेंचे निधन, दिग्गजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार - Thane
ज्येष्ठ नाटककार वामन तावडे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अनेक एकांकिका आणि नाटकांना पुरस्कार मिळाले होते. त्यांच्यावर माजिवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.
वामन तावडेंचे निधन
ठाण्यातील माजिवाडा स्मशानभूमीत त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रेमानंद गज्वी ( लेखक ) ,अभिजित चव्हाण ( कलाकार ) , अभिजित गवस ( दिग्दर्शक ),हेमंत भाटकर ( कलाकार ) ,रमेश वाणी ( कलाकार ) विलास दशपांडे ( निर्माता )वैभव मांगले ( कलाकार ) ,निलेश शेवडे ( कलाकार ) ,महेंद्र तरे देसाई ( दिग्दर्शक ) दिग्दर्शक ,लेखक आणि कलाकार यावेळी उपस्थित होते.