महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

World Thalassemia Day: जागतिक थॅलेसेमिया दिना निमित्त रेड क्रॉसचा जनजागृतीसाठी पुढाकार - रेड क्रॉस दिवस

आपण अनेक दिवस साजरे करत असतो. त्या दिवसांचे औचित्य साधून अनेक ठिकाणी त्या त्या आजारांबाबत जनजागृती केली जाते. असाच एक दिवस म्हणजेच जागतिक थैलासिमिया (World Thalassemia Day) व रेड क्रॉस दिवस (red cross day) या दिवसा निमित्त रेडक्राॅस जनजागृतीसाठी पुढाकार ( Red Cross initiative for public awareness ) घेत आहे.

World Thalassemia Day
जागतिक थॅलेसेमिया दिन

By

Published : May 8, 2022, 8:44 AM IST

ठाणे:थॅलेसेमियाहा रक्तशी संबंधित आजार असून या आजार बाबत म्हणावी तशी जनजागृती होत नाही आणि या आजाराच्या जनजागृती साठी हा (World Thalassemia Day) दिवस साजरा करण्यात येतो . मुख्यतः ज्या व्यक्तींचे हिमोग्लोबिन चे प्रमाण वारंवार कमी होते अश्या व्यक्तींनी तसेच नव्याने लग्न करणाऱ्या जोडप्यांनी थैलासीमिय या आजाराची तपासणी करून घ्यावी. भारतातून या आजाराची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु या रोगाची जनजागृती फारसी न झाल्या कारणामुळे नागरिकांना या रोगाचे गांभीर्य माहित नाही.

थॅलेसेमिया या आजाराचे जनजागृती साठी रेड क्रॉस या जागतिक संस्थेने पुढाकार घेतला असून थेलिसीमिया या अजारासोबतच अन्य आजारांची जनजागृती ( Red Cross initiative for public awareness ) या संस्थे मार्फत करण्यात येते तसेच माफक दरात उपचार देखील पुरवले जातात. रेड क्रॉस ही संस्था जगभरात कार्यरत असून थॅलेसेमिया या आजारावर या दिवसांचे औचित्य साधत जनजागृती केली जाते. ज्यात नवीन विवाहित दाम्पत्यांना मुलासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यांनी थॅलेसेमियाची टेस्ट करणे आवश्यक आहे. असा सल्ला डॉ महेश बेडेकर यांनी दिला आहे.



हेही वाचा : Mothers Day Special : आईच्या पाठिंब्याने जगातील पर्वतांना सर करणारा गिर्यारोहक

ABOUT THE AUTHOR

...view details