लोकांची काम करणे हाच मनसेचा अजेंडा - शर्मिला ठाकरे - राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे
मनसैनिक हा कायम काम करत असतो. त्यामुळे लोकांचा मनसेवर प्रचंड विश्वास आहे. कोरोना काळात जनता सत्ताधारी पक्षाकडे न जाता मनसेच्या ज्या शाखा होत्या तिथे जात होते. लोकांची कामे करणे हाच आमचा अजेंडा आहे. मनसे उगीचच आश्वासने देत नाही, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
नवी मुंबई -नवी मुंबईमध्ये तीन मनसे शाखांचा उदघाटन साेहळा आज पार पडला. हे कार्यक्रम शर्मिला ठाकरे, आमदार राजू पाटील आणि मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता यांच्या हस्ते पार पडले.
कोरोना काळात जनतेला सत्ताधारी पक्षापेक्षा मनसेने लोकांची मदत केली आहे. मनसे करीत असलेल्या कामामुळे लोकांची मनसेकडून प्रचंड अपेक्षा आहे. काम हाच मनसेचा अजेंडा आहे. तसेच मनसेचे उमेदवार नवी मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून येतील, अशी आशा राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली.