महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे : कल्याणातील वीटभट्टीवरून 'श्रमजीवी'ने केली मजुरांची मुक्तता - श्रमजीवी

ठाण्याच्या कल्याण तालुक्यातील एका वीटभट्टीवरून बंधबिगारी मजुरांची श्रमजीवी संस्थेने मुक्तता केली. या प्रकरणी वीटभट्टी मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मजुरांशी संवाद साधताना विवेक पंडित व अन्य
मजुरांशी संवाद साधताना विवेक पंडित व अन्य

By

Published : Dec 21, 2019, 6:38 AM IST

ठाणे- गेल्या महिन्याभरात दाखल झालेल्या तीन गुन्ह्यानंतर गुरूवारी (दि. 19 डिसें) कल्याण तालुक्यातील एका वीटभट्टीच्या दोन मालकांवर बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम 1976 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आदिवासी मजूर कुटुंबाला बंधबिगारीतून श्रमजीवी या संस्थेने मुक्त केले. नरेश मंगेश जाधव आणि त्यांची पत्नी अंजनी नरेश जाधव अशी वेठबगारीतून मुक्त झालेल्या मजुरांची नावे आहेत. तर बयाना देऊन आदिवासी मजुरांना गुलामगिरीच्या पाशात अडकविण्याच्या अन्यायकारक प्रथेला श्रमजीवी संघटनेने प्रखर विरोध केला आहे.

वेठबिगारीतून मुक्त झालेले जाधव दाम्पत्य


कल्याण तालुक्यातील निंबवली गावातील दिनेश कचरू केणे आणि संजय कचरू केणे यांच्या वीटभट्टीवर असलेल्या नरेश जाधव (रा. चिंचवली, ता.भिवंडी) या मजुराचे कुटुंब 20 हजार रुपये बयाना घेतल्याने काम करत होते. याच नरेशच्या ओळखीच्या वाडा तालुक्यातील मजुरांनी याच मालकाकडून 10 हजारांची उचल घेतली होती. त्यानंतर त्यांनी कामावर येण्यास नकार दिलेला. नरेश याने मन मोठे करत त्यांचेही पैसे माझ्या मजुरीतून कापून घ्यावे, अशी हमी मालकाला दिली. मात्र, तरीही अन्यायकारक भूमिका घेत नरेशने स्वतः कर्ज काढून घेतलेली मोटारसायक मालकाने ताब्यात घेत नरेशला स्वतःची जुनी गाडी वापरण्यास दिली. बयाना रकमेसाठी अत्यल्प मजुरीत तो राबवून घेत नरेशला त्रास देत होता.

मागील आठ दिवस ठाणे, पालघर जिल्ह्यातील श्रमजीवी संघटनेचे सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या गटाने वीटभट्टीवर प्रत्यक्ष जाऊन मजुरांशी संवाद साधत आहेत. यामध्ये ज्या ठिकाणी मजुरांना बळजबरीने आणले आहे. ज्यांना मारहाण होत असेल अशा प्रकणात तातडीने कारवाई केली जात आहे. त्यामुळे कायद्याने गुन्हा असलेली बयाना पद्धत बंद करावी, मजुरांच्या असाहाय्यतेच फायदा उचलून त्यांना अत्यल्प मजुरीत राबवणे बंद व्हावे. यासाठी विवेक पंडित यांनी मालकांना बयाना देऊ नका, असे आवाहन केले होते. मात्र, काहींना या आवाहनाला केराची टोपली दाखवली होती.

हेही वाचा - जप्त केलेला युरिया खताचा साठा गोदाम मालकांनी चोरला, दोघांविरोधात गुन्हा दाखल


विवेक पंडित यांचा गुरूवारी आश्रमशाळा आणि वीटभट्टी मजुरांशी सवांद दौरा होता. यात हा प्रकार समोर आला. त्यांनी तातडीने याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात विटभट्टीचे मालक दिनेश आणि संजय कचरू केणे यांच्यावर वेठबिगारी आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रार दिली. यावरून टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मजुरांची मुक्तता करण्यात केली. गुन्हा दाखल होताच दिनेश आणि संजय केणे हे दोघेही पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - CAA protest:भिवंडीत मुस्लिम बांधव रस्त्यावर

ABOUT THE AUTHOR

...view details