महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील मजुरांना लॉकडाऊन वाढण्याची भीती; भर उन्हात पायीच निघाले गावी - workers fear increase lockdown

मुंबई येथे महिला घरकाम तर पुरुष मंडळी रोजंदारीवर काम करीत असतात, मात्र लॉकडाऊनमुळे सध्या काम बंद आहे. तर, शिधावटप पत्रिका नसल्याने धान्यही मिळत नाही. जेवणाची पाकिटे कधी मिळतात, तर कधी उपाशीपोटी राहावे लागत असल्याने नाईलाजास्तव गावी निघालो असल्याची माहिती सुनीता संजय खुराडे या महिला मजुराने दिली आहे.

workers fear increase lockdown
मजूर

By

Published : Apr 30, 2020, 8:05 PM IST

ठाणे- महाराष्ट्रात विशेष करून मुंबई एमएमआरडीए क्षेत्रात कोरोनाबधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे ३ मे नंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या भीतीने मुंबई परिसरात मोलमजुरी करून राहणाऱ्या महाराष्ट्रातील मजुरांनीही आपल्या गावाकडची वाट धरली आहे.

माहिती देताना महिला मजूर

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरवातीला २१ व त्यानंतर १९ दिवसांचा अर्थातच ४० दिवसांचा लॉकडाऊन ३ मे पर्यंत राहणार आहे. त्यातच मुंबईतील कंजूरमार्ग येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबीयांच्या हाताला काम नाही, हाती पैसा नाही, त्यामुळे या कुटुंबीयांनी अकोला जिल्ह्यातील आपल्या गावाकडली वाट धरली आहे. मजुरांची ६०० किलोमीटरची पायपीट सुरू आहे. भर उन्हात डोक्यावर गाठोडे, कडेवर लहानग्यांना घेऊन मजूर कुटुंबांची भर उन्हातली पायपीट मन विषण्ण करणारी आहे.

मुंबई येथे महिला घरकाम तर पुरुष मंडळी रोजंदारीवर काम करीत असतात, मात्र लॉकडाऊनमुळे सध्या काम बंद आहे. तर, शिधावटप पत्रिका नसल्याने धान्यही मिळत नाही. जेवणाची पाकिटे कधी मिळतात, तर कधी उपाशीपोटी राहावे लागत असल्याने नाईलाजास्तव गावी निघालो असल्याची सुनीता संजय खुराडे या महिला मजुराने दिली आहे. त्याचबरोबर, गावी पोहचलो तरी १४ दिवस शिवार शेतात राहू, पण तेथे खायला कोण देणार ही विवंचना आहेच, असे दुःख सुनीता खुराडे हिने व्यक्त केले आहे. दरम्यान, शासन मजूर व कामगारांसाठी मोठ्या प्रमाणावर धान्य आणि जेवण उपलब्ध करून देत असले तरी आजही बऱ्याच जणांपर्यंत ते पोहचत नाही. त्यामुळेच, शहरातील मजूर रखरखत्या उन्हात गावाकडे निघाले आहेत.

हेही वाचा-ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईची कामे जलदगतीने पूर्ण करा, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details